AMCA will soon join the army
india defence news , today marathi news , marathi news , marathi breaking news ,
AMCA वर सर्वात मोठी आनंदाची बातमी
भारत AMCA लढाऊ विमानाच्या दोन प्रोटोटाईप वर खूप वेगाने काम करत होता , आणि हे दोन्ही फुल स्केल प्रोटोटाईप होते . आणि तुम्हाला हे जाणून आनंद होईल की त्यांचे अभियांत्रिकीचे सर्व काम आज पूर्ण झाले आहे . इतकेच नाही तर भारताचे वित्त मंत्रालय आणि भारताचे संरक्षण मंत्रालय यांनी एकमेकांशी सल्लामसलत करून येत्या 2 - 3 महिन्यामध्ये म्हणजेच 2022 च्या जानेवारी - फेब्रुवारी मध्ये ह्याला (कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटी ) सुरक्षा विषयक मंत्रिमंडळा कडे पाठवण्यात येणार आहे . आणि ह्या सुरक्षा विषयक समितीचे नेतृत्व करत आहेत , भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी . आणि तिथून AMCA ला मंजुरी मिळणार आहे . आणि ह्या लढाऊ विमानामध्ये वित्त मंत्रालय सहभागी होण्याचं कारण असं आहे की AMCA लढाऊ विमान बनवण्यासाठी अंदाजे खर्च 15000 कोटी रुपये म्हणजेच 2 बिलियन डॉलर्सवर जाणार आहे . आणि त्यासाठी संरक्षण मंत्रालय आणि वित्त मंत्रालय एकत्र येऊन काम करणार आहेत . आणि असा अंदाज आहे की सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ ह्याला 2022 च्या सुरुवातीलाच मंजुरी देऊन टाकेल .
AMCA लवकरच होणार सैन्यात सामील
आणि एकदा मंजुरी भेटली की लगेच त्यांची चाचणी करून भारत 36 AMCA लढाऊ विमान बनवण्याच्या प्रक्रियेला सुरवात करेल . आणि AMCA मध्ये सुरवातीला जे इंजिन वापरले जाणार आहे ते अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रिक ह्या कंपनीचे वापरले जाणार आहे आणि त्या इंजिनचे नाव आहे F414 . आणि आपण ह्या इंजिनचा वापर ह्यासाठी करतोय कारण की आपण स्वदेशी इंजिन जर ह्यामध्ये वापरायचे ठरवले तर त्यासाठी आपल्याला अजून 10 -15 वर्षे थांबावे लागेल . आणि चीनचा धोका लक्षात घेता भारताला लवकरात लवकर लढाऊ विमान हवे आहे , अशा स्थितीत अमेरिकी लष्कराची मदत घेऊन भारत लवकरात लवकर AMCA लढाऊ विमान आपल्या हवाई दलामध्ये सामील करून घेणार आहे आणि जोपर्यंत 36 AMCA तयार होतील तोपर्यंत भारताचे स्वदेशी इंजिन पण तयार होईल . आणि त्यानंतर जेवढे पण AMCA तयार होतील त्यामध्ये स्वदेशी इंजिनचा वापर केला जाईल .