रशियाच्या हातात स्वदेशी इंजिन
Kaveri Engine in Russian hands
india defence news , today marathi news , marathi news , marathi breaking news ,
डिफेन्स इंडस्ट्रीला जे जवळवून ओळखतात त्यांना माहित असेल की पूर्ण डिफेन्स इंडस्ट्री मध्ये जेवढे हत्यारे तयार होतात त्या मध्ये सर्वात अवघड आणि कॉम्प्लिकेटेड असते जेट इंजिन आणि ड्रोन इंजिन बनवणे . हे इंजिन बनवण्याची प्रक्रिया खूप किचकट आणि वेळ घेणारी असते . त्याच बरोबर खूप खर्चिक सुद्धा असते . म्हणून आजच्या तारखेला जगात असे काही बोटावर मोजण्याइतके थोडेच देश आहेत त्यांनी स्वतः जेट इंजिन बनवले आहे . आणि भारत पण आता स्वतःचं जेट इंजिन बनवण्याचा प्रयत्न करत आहे . आणि त्यासाठी DRDO कावेरी जेट इंजिन (Kaveri Engine) वर काम करत आहे . आणि आज त्यावरच एक महत्वाची बातमी आली आहे .
कावेरी इंजिन स्टेल्थ UCAV ऑरा (AURA) मध्ये
india defence news , today marathi news , marathi news , marathi breaking news ,
कावेरी जेट इंजिन ( Kaveri Engine) हे दीड महिन्यानंतर म्हणजेच जानेवारी २०२२ मध्ये रशियाला पाठवणार आहे , आणि यामध्ये फ्रान्स चे नाव पण मध्ये येत आहे . जेट इंजिन रशिया ला पाठवायचे कारण असे आहे की , रशिया मध्ये एक खूप मोठे संशोधन संस्था (research intitute) आहे त्याचे नाव आहे ग्रोमोव्ह फ्लाइट रिसर्च इन्स्टिट्यूट (Gromov Flight Research Institute) आणि ह्या इन्स्टिटयूट मध्ये एक असे विमान आहे ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचे जेट इंजिन लावून चेक केले जाऊ शकते आणि भारताकडे असे कोणतेही विमान उपलब्ध नाहीये . ह्या विमानामध्ये दोन्ही बाजूने दोन दोन इंजिन आहेत आणि त्यातल्या एक एक मेन इंजिन ला काढून त्या जागी कावेरी जेट इंजिन लावून टेस्टिंग केली जाईल . आणि टेस्टिंगच्या वेळी जर कावेरी जेट इंजिन मध्ये काही बिघाड आला तर दुसऱ्या मेन इंजिनचा उपयोग करून ते विमान चालवले जाईल . आणि हे इंजिन बनवण्यासाठी रशिया बरोबर फ्रान्स पण आपल्याला मदत करत आहे . फ्रान्सची एक मोठी कंपनी आहे डसॉल्ट सिस्टीम्स (Dassault Systèmes) . ही कंपनी भारताच्या ( Kaveri Engine)कावेरी इंजिन मध्ये थ्रीडी डिझाइन मॉडेलिंग आणि इंजिनिअरिंग मध्ये मदत करत आहे . आणि त्यांची मदत घेऊन कावेरी इंजिन अजून ऍडव्हान्स आणि इफिसिएंट बनवण्याचे आहे . हे भारताचे खूप कृशल इंजिन आहे कारण ह्या इंजिनचा उपयोग स्टेल्थ UCAV म्हणजेच ऑरा (AURA) होणार आहे म्हणून ह्या इंजिनचे लवकरात लवकर तयार होणे खूप गरजेचे आहे . आणि भारताला ऑरा मध्ये स्वदेशी इंजिनच लावायचे ठरवले आहे , म्हणून भारत दुसऱ्या देशांकडून थोडी थोडी मदत घेत आहे . आणि लवकरात लवकर इंजिन तयार करून भारत इंजिन साठी आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करत आहे .
MORE LETEST MARATHI BREAKING NEWS
तुर्की मधून सर्व देश गेले निघून
भारताच्या सीमेवर इस्रायली शस्त्र तैनात
रुस ने केल्या पाकिस्तानच्या कंपनी ब्लॅक लिस्ट