Oil च्या किमती झाल्या कमी

Oil prices fall


oil prices fall

World news , india defence news , today marathi news , marathi news , marathi breaking news 



भारत अमेरिका ने जिंकले ऑइल युद्ध


 भारत, अमेरिका, ब्रिटन, जपान, दक्षिण कोरिया आणि युरोपातील काही देशांनी मिळून एखाद्याविरुद्ध युद्ध सुरू केले, तर ते टाळणे शक्य आहे का, तर त्याचे साधे उत्तर असेल, ते अजिबात शक्य नाही . हे सर्व देश स्वबळावर खूप शक्तिशाली आहेत, जर ते एकत्र आले तर ते एक प्रचंड शक्ती बनते, या सर्व देशांनी काही तासांपूर्वी एक युद्ध सुरु केले होते आणि आता . काही तासांनंतर ते युद्ध जिंकण्याच्या मार्गावर आहे. काही महिन्यांपूर्वी OPEC म्हणजेच  पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची संघटना यांमध्ये एक बैठक झाली होती ,आणि या बैठकीत असे ठरले की येत्या काही महिन्यांसाठी जमिनीतून तेल कमी बाहेर काढायचे .आणि बाजारामध्ये तेलाचा तुटवडा करायचा , आणि तुम्हाला बाजाराचा नियम माहित आहे बाजारात जर एखाद्या गोष्टीचे खरीददार जास्त असतील आणि आणि ती गोष्ट बाजारात कमी असेल तर त्या गोष्टीचा भाव वाढतो . आणि गेल्या सहा महिन्यात तेलाच्या किमती किती वाढल्या आहेत हे तुम्ही पाहिले असेलच .आणि आता २० दिवसापूर्वी कच्या तेलाच्या किमती सर्वोत्तम उच्च स्थानावर गेल्या होत्या .


१५ देशांची झाली हार 


म्हणून काही दिवसांपूर्वी भारत चीन अमेरिका ब्रिटन देशांनी सौदी अरेबियाला सांगितले की तुम्ही कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवा म्हणजे आम्हाला महागाई मधून थोडा दिलासा भेटेल , पण सौदी अरेबिया आणि त्यांचे मित्रपक्ष यांनी यासाठी स्पष्ट नकार दिला , याबरोबर रशियाने पण यासाठी नकार दिला . यामुळे सर्व देश संतप्त झाले आणि मग या सर्व देशांनी म्हणजेच भारत, अमेरिका, ब्रिटन, युरोपियन देश याशिवाय जपान, दक्षिण कोरिया आणि अगदी चीनलाही एकत्र केले आणि या सर्व देशांनी एकत्रितपणे ठरवले की सर्वानी आपातकालीन परिस्तिथी साठी जो तेलाचा साठा ठेवला आहे तो बाजारामध्ये घेऊन यायचा . आणि त्यामुळे काही काळानंतर बाजाराच्या आत तेल खूप जास्त होईल ,आणि त्यामुळे तेलाच्या  किमती कमी होतील . आणि त्यानंतर जे OPEC देश आहेत त्यांना याच्यामुळे खूप नुकसान सोसावे लागेल , आणि मग ह्या देशांना बाकी देशांचे ऐकून कच्या तेलाच्या किमती कमी कराव्या लागतील . आणि याचा निर्णय काल घेतला गेला होता आणि कालपासूनच अमेरिका , भारत , जापान ,दक्षिण कोरिया ने आपातकालीन तेल साठा बाजारात मोकळा केला होता .


Oil Prices Fall

World news , india defence news , today marathi news , marathi news , marathi breaking news 



जपानने ४२ लाख बॅरल तेलाचा साठा मोकळा केला , ब्रिटन ने 1.5 दशलक्ष बॅरल तेलाचा साठा मोकळा केला , भारताने ५० लाख बॅरल तेलाचा साठा मोकळा केला आणि त्यांनंतर दक्षिण कोरियाने त्याच्या पूर्ण साठ्यापैकी ४ टक्के तेल साठा बाजारात मोकळा केला . आणि हे सर्व खूप वेगाने होत होते आणि हे अजून पण खूप वाढले असते परंतु चीनने आयत्या वेळी माघार घेतली आणि सांगितले कि आम्ही थोड्या दिवसानंतर तेलाचा साठा मोकळा करू . परंतु बिनचिनच्या आजच तेलाच्या किमती बाजारात कमी होयला सुरवात झाली आहे . आणि आत्ता येत्या १० दिवसामध्ये ह्या किमती अजून खूप खाली येतील . आणि आता सौदी अरेबिया आणि त्याच्या OPEC सहयोगी देशांना नुकसान सोसावे लागणार आहे .


आणि आता प्रश्न हा आहे की चीनने बाकी देशांना साथ का नाही दिली , तर याच मुख्य कारण असे आहे कि चीन मध्ये मागील ३ महिण्यात विजेचे संकट आले होते आणि तेव्हा त्याच्या सर्व कोळश्याच्या खाणी बंद पडल्या होत्या आणि तेव्हा चीन ने  विजेच्या संकटातून बाहेर निघण्यासाठी आधीच त्याच्या रिझर्व्ह साठ्यामधून तेल घेऊन वीज बनवली होती , आणि त्यामुळे चीनचा तेल साठा आधीच खूप कमी झालेला आहे आणि वाढत्या किमतीमुळे चीन सुद्धा त्याचा तेलाचा साठा पुन्हा भरू शकला नव्हता आणि आता पुन्हा तेल बाहेर काढणे त्याच्या साठी शक्य नव्हते . आणि हे सगळं लपवण्यासाठी चीनने अस सांगायला सुरवात केली आहे की त्याला रशियाला वाचवायचं होत म्हणून तो भारत आणि अमेरीच्या बाजूने नाही गेला . आणि त्यामुळे चीनचा कमीपणा दुसऱ्या देशांसमोर झाकून गेला .  



MORE LETEST MARATHI BREAKING NEWS











Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने